मॅजिक बॉक्स हे नाव असलेले हे खास रांगोळी साचे इतके सोपे आणि सुलभ आहेत की घरातील कुणीही अवघ्या 20 ते 25 सेकंदांत उठावदार रांगोळी सहज काढू शकतो. विशेष म्हणजे या साच्यांमध्ये डबल कलर रांगोळी करण्याची सोय असून एकाच साच्यात दोन रंग वापरून अधिक आकर्षक आणि लक्षवेधक रांगोळी तयार करता येते. पारंपरिक डिझाईन्सपासून ते ट्रेंडनुसार बदलणाऱ्या आधुनिक आकृतींपर्यंत 9 विविध प्रकारचे साचे या बॉक्समध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
मॅजिक बॉक्समध्ये 2 रंगांचे डब्बे आणि हे 9 साचे मिळतात आणि त्याची किंमत फक्त 350 रुपये इतकी किफायतशीर आहे. याशिवाय पट्यांच्या रांगोळ्या केवळ 100 रुपयांत उपलब्ध आहेत. ए वन रांगोळी कलेक्शन कडून होलसेल दरातही साचे मिळतात आणि संपूर्ण मुंबईमध्ये मोफत होम डिलिव्हरीची सुविधा दिली जाते.
रोजच्या गडबडीत वेळ वाचवूनही तुमच्या दारात आकर्षक आणि उठावदार रांगोळी असावी, असं वाटत असेल तर मॅजिक बॉक्स हे खरोखरच परफेक्ट पर्याय ठरतो, असे ब्रँडचे मालक सांगत आहेत. सणाच्या आधीच यांची मागणी वाढत असल्याने स्टॉक लवकर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून तुमची ऑर्डर लवकरात लवकर नोंदवा असे आवाहन त्यांनी केले आहे.