पुणे : इंग्रजी नवीन वर्षातील पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. विशेषतः 14 किंवा काही वेळेस 15 जानेवारीलाच हा सण येतो. या सणासाठी महिला तसेच नवंवधू या वर्षभर वाट पाहत असतात. हलव्याचे दागिने, काळी साडी ही घातली जाते. तर यासोबतच खण देखील पाहिला मिळतात. पुण्यातील कुंभार वाडा याठिकाणी मोठ्या प्रमाणात हे खण तयार करण्याचे काम हे कुंभार व्यवसायिक करत असल्याचे पाहिला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्तात याची खरेदी करू शकता.
advertisement
कुंभार वाडा ही जुनी बाजारपेठ असून इथे विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू तयार करण्याचे काम हे केले जात. अनेक लोक ही अनेक पिढ्यांपिढ्या हे काम करत आहेत. इथे मिळणाऱ्या गोष्टी या अगदी होलसेलच्या दरात मिळतात. त्यामुळेच ग्राहक वर्गाची मोठी पसंती जी आहे ती मिळते. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे सर्व प्रकारचे ग्राहक हे इथे येतात. प्रत्येक सणानुसार त्यासाठी लागणारे गोष्टी ह्या बनवण्याचे काम ही लोक करत असतात. या ठिकाणी तुम्ही 40 रुपयांपासून खणाची खरेदी करू शकता.
शाहीहार ते चिंचपेटी, मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, 70 रुपयांपासून करा खरेदी
हा व्यवसाय आमचा पिढ्यानपिढ्या चालू आहे. गेली पंधरा दिवस झाले हे सगळं बनवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या वर्षी भाव वाढले असून ग्राहक खरेदीसाठी काही प्रमाणात पाठ फिरवत आहेत. छोट्या कुंड्या ह्या 40 रुपयाला 5 आहेत तर मोठ्या कुंड्या ह्या 50 रुपयाला 5 आहेत. यासाठी लागणारा माल हा महाग झाल्यामुळेच हे दर यंदा वाढले आहेत, अशा भावना व्यवसायिकांनी व्यक्त केल्या.