याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बेडशीट उपलब्ध आहेत. कॉटन, राजस्थानी, जयपुरी, पारंपारिक, किंग साईज दुहेरी बेडशीट या ठिकाणी उपलब्ध आहेत. सिंगल बेडशीट 110 रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर डबल बेडशीट हे 220 ते 800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या बेडशीटमध्ये अनेक साईज ऑप्शन उपलब्ध आहेत. यावर आकर्षक फ्लोरल पॅटर्न आणि डिझाईन या जागी उपलब्ध आहेत, असं दुकान मालक राजेश यांनी म्हटलं.
advertisement
याठिकाणी 90 इंच रुंद आणि 100 इंच लांब कॉटन मटेरियलपासून बनवलेल्या डबल बेडशीट आहेत. या बेडशीटमुळे तुम्हाला आरामदायक फील मिळेल. या सर्व बेडशीटवर तुम्हाला सुंदर फ्लोरल प्रिंट पॅटर्न पाहायला मिळतील. या सुंदर बेडशीट कॉटन फॅब्रिक मटेरियलपासून बनवलेल्या असून फारच आकर्षक दिसतात. त्याचबरोबर बेडशीट गिफ्ट करण्यासाठी देखील तुम्हाला याठिकाणी अनेक बेस्ट ऑप्शन्स मिळू शकतात. अगदी स्वस्तात मस्त आणि कमी किमतीत जर तुम्हाला या प्रकारचे काही बेडशीट घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.
बेडशीट निवडताना हे ध्यानात घ्या
बेडशीट निवडताना, आराम, टिकाऊपणा आणि तुमच्या झोपेच्या गरजेनुसार उत्तम फॅब्रिक निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थ्रेड काउंट, विणकाम आणि तुमच्या गादीचा आकार यासारख्या गोष्टींचा विचार करणे देखील आवश्यक आहे. बेडशीटवरील फक्त नक्षीकाम न बघता रंगकाम देखील तपासावे. एका धुण्यानंतर रंग उडू नये यासाठी मिठाच्या पाण्यात भिजवून हे बेडशीट अगदी हलक्या हाताने धुवावे जेणेकरून बेडशीटचा रंग निघणार नाही आणि त्याचे धागे देखील कमकुवत होणार नाहीत.