Jewellery Shopping : पारंपरिक दागिन्यांची करा श्रावणात खरेदी, फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यातील हे मार्केट माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा आणि खासकरून महिलांसाठी मंगळागौरचा सण. याच निमित्ताने महिला पारंपरिक नऊवारी साडीला शोभा आणणारे दागिने शोधण्यास सुरू झाल्या आहेत.
मुंबई: श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा आणि खासकरून महिलांसाठी मंगळागौरचा सण. याच निमित्ताने महिला पारंपरिक नऊवारी साडीला शोभा आणणारे दागिने शोधण्यास सुरू झाल्या आहेत. ठाण्यातील पालिका शॉपिंग मार्केट तांबरी कलेक्शन दुकानात अगदी 50 रुपयांपासून पारंपरिक दागिन्यांची खरेदी करता येत आहे, त्यामुळे महिलांमध्ये या दुकानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या दुकानात पारंपरिक आणि ट्रेंडिंग अशा विविध प्रकारचे दागिने अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. अहो लिहिलेले खास झुमके केवळ 50 रुपयांमध्ये मिळत असून, साधे टॉप्स फक्त 30 रुपयांना उपलब्ध आहेत. मोत्यांचे झुमके 100 रुपयांना तर डिझायनर मंगळसूत्रांची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते आणि 200 रुपयांपर्यंत जाते.
advertisement
याशिवाय, कानातले 200 ते 300 डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. बांगड्यांची रेंज 100 पासून 300 रुपयांपर्यंत आहे. पारंपरिक साईहार केवळ 200 रुपयांना, लक्ष्मी हार सेट 600 रुपयांना मिळतो. नथ या पारंपरिक दागिन्याच्या 70 ते 80 डिझाईन येथे पाहायला मिळतात, ज्यांची किंमत 50 पासून 200 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
अहो लिहिलेलं मंगळसूत्र 100 रुपयांना उपलब्ध आहे, तर चंद्रकोर सेट 350 रुपयांमध्ये मिळतो. कोल्हापुरी साजासाठी 650 रुपये आणि चिंचपेटी फक्त 100 रुपयांना विक्रीस आहे. याशिवाय, 1 ग्राम सोन्याच्या पॉलिशचे मंगळसूत्र 1500 ते 2500 रुपयांपर्यंतच्या श्रेणीत आहे.
या दुकानाने महिलांसाठी सणासुदीच्या खरेदीला एक नवे परवडणारे आणि पारंपरिक स्वरूप दिले आहे. पारंपरिक दागिन्यांची शौकिन महिलांनी एकदा तरी या दुकानाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन दुकानदारांनी केले आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
July 23, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jewellery Shopping : पारंपरिक दागिन्यांची करा श्रावणात खरेदी, फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यातील हे मार्केट माहितीये का?

