शाळेकडून तुषारचा सत्कार
तुषारचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कल्याणच्या के. सी. गांधी शाळेत झाले आहे. याच के सी गांधी शाळेच्या वतीने त्याच्या यशाबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याच शाळेने सुरुवातीपासूनच माझ्यावर संस्कार केले. प्रेम केले आणि माझ्यातील खेळाच्या आवडीला पाठिंबा देत प्रोत्साहन दिले. ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. ही फक्त सुरुवात आहे अजून, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र तरीही कायमच पाठ थोपटणाऱ्या शाळेने कौतुकाने सोहळा आयोजित केल्याने आपण धन्य झाल्याचे तुषार म्हणाला.
advertisement
महाराष्ट्रातील या गावात गणेशोत्सव होत नाही साजरा, काय आहे कारण?
ध्येयावर लक्ष द्या
कल्याणात खेळाडूसाठी पुरेशा सुविधा नसल्याच्या प्रश्नावर बोलताना त्याने खेळाडू मिळेल त्या सुविधेतून प्रगती करू शकतो. मात्र कल्याणात सर्व सुविधांनी युक्त मैदान तयार केले गेल्यास आपल्या भागातून देखील इंटरनॅशनल खेळाडू घडू शकतील. आपल्याच शहराचे नाव रोशन होऊ शकेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. मात्र त्याच बरोबर सुविधा नाहीत म्हणून ओरडत बसण्यापेक्षा मेहनत करण्यावर लक्ष द्या. आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्या, असा सल्ला त्याने विद्यार्थ्याना दिला.
धोनी माझा आदर्श
रांची सारख्या छोट्या गावातून आलेला एक खेळाडू एम.एस. धोनी कप्तान पदापर्यंत पोहोचतो आणि तीन तीन आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतो हे समोरचे उदाहरण आहे. मागील तीन वर्षांपासून मी क्रिकेटपटू धोनी बरोबर मैदानात वावरत आहे. मी नेहमीच त्याची जिंकण्याची जिद्द आणि त्यासाठी कोणत्याही स्तरावर मेहनत करण्याची तयारी जवळून पाहत आलो आहे. म्हणूनच धोनी माझा आदर्श असल्याचे तुषार सांगतो.
तुम्हाला नीट झोप लागत नाही? 'या' पदार्थांना रात्रीच्या जेवणातून करा हद्दपार
प्यारवाली लव्हस्टोरी?
तुषार 21 डिसेबर 2023 रोजी आपली बालपणीची मैत्रीण नभा गड्ड्मवार हिच्याशी लग्न बंधनात अडकणार आहे. याबाबत बोलताना त्याने अगदी ज्युनियर केजी पासून नभा आणि मी शाळेत एकत्र शिकत होतो. मात्र दहावी नंतर दोघांच्या वाटा बदलल्या. नभा आपल्याला सुरुवाती पासूनच आवडायची म्हणूनच सोशल मिडियावर तिला पुन्हा एकदा शोधलं आणि अखेर आम्ही एकत्र आल्याचे तुषारने सांगितले. नभाने फाईन आर्ट मध्ये शिक्षण घेतले असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये भल्याभल्यांची विकेट उडवणाऱ्या तूषारची विकेट नभाने घेतली, अशी चर्चा आता सुरू आहे.





