काय म्हणाले जरांगे पाटील?
'हे जाणूनबुजून केलं जात आहे, राज्याने काही महिन्यांपूर्वीच शिफरस केली होती हे माहिती होतं. मराठ्यांनाही घेतलं जाईल अशी आशा होती. त्यांना घेतलं याचं आम्हाला दु:ख नाही. मराठे का ओबीसीमध्ये जात नाहीत? या सगळ्या जाती आत घालत आहात ही कोणती खुन्नस आहे. आम्ही वर्षापासून आंदोलन करतोय तुम्हाला थोडी लाज वाटत नाही. तुम्ही आमच्या डोळ्यादेखत त्यांना ओबीसीमध्ये घालता. तुम्ही जाणूनबुजून खुन्नस दाखवत आहात', असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
advertisement
'आचार संहिता लागण्याआधी मराठ्यांचा निर्णय घेतला नाही तर तुमच्या पुऱ्या सीटा पाडून टाकेन. तुम्ही मराठ्यांचा इतका द्वेष करायला लागला. तुमच्या मंत्रिमंडळ बैठकीला काडी लावा, ज्या जाती आरक्षणात जाऊ शकत नाही त्यांना तुम्ही घालू लागला आहात. हे मराठ्यांच्या छाताड्यावर बसले आहेत, तुमचा सुपडा साफ करू. तुम्ही आचारसंहिता लावली ना तर 55 टक्के मराठा समाज आहे, तुमची एक सीट येऊ देणार नाही', असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.