छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेरूळ घाटात एक भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे. आयशर टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. मात्र, या अपघातात मोटरसायकलवरून जाणाऱ्या 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. वेरूळहून खुलताबादकडे एकआयशर ट्रक येत होता. या आयशर ट्रकवर भलामोठा बॉयलर होता. त्याचवेळी समोरून एक ट्रक येत होता. या वेळी आयशर ट्रक आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडकी इतक्या जोरात होती की, धडकेत आयशरमध्ये ठेवलेला जड लोखंडी बॉयलर रस्त्यावर पडला.
advertisement
दुर्दैवाने याच वेळी शेजारून जाणारी दुचाकी बॉयलर खाली सापडले. या दुचाकीवर दोघे जण जात होते. बॉयलर अंगावर कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका पुरुषाचा आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. अपघातानंतर घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल होते. अपघातानंतर घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह हे शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, बॉयलर घाटामध्येच आडावा झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दोन्ही मार्गाने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली आहे.