TRENDING:

Dombivli: पहिल्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीसोबत 47 वर्षीय मुख्याध्यापकाचं चिड आणणारं कृत्य, डोंबिवलीतील घटना

Last Updated:

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : डोंबिवलीमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. निलजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाने पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी नराधम शिक्षकाला बेदम चोप दिला.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार (४७) असं या नराधमाचं नाव आहे. महेंद्र खैरनार याने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत केलेल्या कृत्यानंतर  ग्रामस्थांनी या नराधम शिक्षकाला चोप देऊन मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

कल्याण तालुक्यात निळजे जिल्हा परिषद शाळा ही इयत्ता १ ते ७ वीपर्यंत असून ३ पुरुष शिक्षक तर २ महिला शिक्षका आहेत. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीशी अश्लिल वर्तन केलं. नंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

आई- वडिलांना हे कळताच त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच निळजे गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख ॲड मुकेश भोईर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेतली आणि कार्यकर्त्यांसह शाळेवर पोहोचले. तिथे जाऊन नराधम मुख्याध्यापक महेंद्र याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला मानपान पोलिसांच्या स्वाधीन केलं  आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षक महेंद्र याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli: पहिल्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीसोबत 47 वर्षीय मुख्याध्यापकाचं चिड आणणारं कृत्य, डोंबिवलीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल