पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या महत्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही १७ वर्षांची आहे. ती एका महाविद्यालयात नर्सिंगचा कोर्स करते. इंन्साटाग्रामवर एका नातेवाईक तरुणाशी तिची ओळख झाली. त्याने तिला इंन्साटाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा वाढली आहे. दोघांनी एकमेकांना फोन नंबर शेअर केला. त्यानंतर दोघांची फोनवर संवाद सुरू झाला. आरोपी मुलाने तिला बॉयफ्रेंड आहे का अशी विचारणा केली आणि तुला बॉयफ्रेंड मिळवून देतो, असं सांगितलं. त्यानंतर या नातेवाईक तरुणाने त्याच्या आरोपी मित्राची ओळख करून दिली. त्यानंतर एक दोन असे ८ जणांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजवर तिच्यावर अत्याचार केले. या दरम्यान पीडित मुलगी ही गरोदर राहिली होती. आरोपीनी तिचा गर्भपात केला होता, अशी माहिती वकिलांनी दिली.
advertisement
आठ जणांनी पीडितेचे लॉजवर तोडले लचके
'त्यानंतर पीडितेनं पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईक मित्र आणि ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ८ वा आरोपी फरार आहे. यामध्ये गर्भपात केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर आरोपींवर गँगरेपचाही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यामध्ये आयटी अॅक्ट लावला आहे. आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले होते, त्यावेळी मोबाईलमध्ये व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड केले होते. आणि हे व्हिडीओ इतर आरोपींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते.
30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
सर्व आरोपींना आज मंगळवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते. पीडित ही नर्सिंगचा कोर्स करत असल्याचं सांगितलं आहे. आरोपींना ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल आणि गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. ती न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.