दक्षिणेकडून येतंय संकट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे त्याची टर्फ लाईन ही महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांपर्यंत येत आहे. त्यामुळे हवामानात पुढचे 48 तासात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा वाढला तर अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे.
प. बंगालच्या खाडीतही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
advertisement
दुसरं महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालच्या खाडीतून वरच्या बाजूला सेवन सिस्टरच्या दिशेनं दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यामुळे तिकडून येणारे वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे यामुळे हवामान सतत बदलत आहे. कधी दमट तर कधी हलक्या पावसाच्या सरी आणि त्यानंतर वाढणारा उकाडा यामुळे हैराण व्हायला झालं आहे. दुसरं म्हणजे ला निनामुळे यंदा थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे.
विकेण्डला महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा
10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस जाणार ऊन उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मे महिन्यासारखी स्थिती ऑक्टोबरमध्येच पाहायला मिळू शकते. विकेण्डला ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात फारसा पाऊस राहणार नाही.
पुढचे 72 तास महत्त्वाचे, कोकणात मुसळधार
तळ कोकणात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहील. यावेळी 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्य़ामुळे मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 10 ते 12 ऑक्टोबर रोजी दक्षिणेकडे मुसळधार पाऊस राहणार आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाचा कोणताही अलर्ट असणार नाही. दमट हवामान काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात कोणताही पावसाचा अलर्ट नसेल. दक्षिणेकडे हवामानात वेगाने बदल झाले तर महाराष्ट्रात देखील पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र ते येत्या 72 तासात पाहावं लागेल असं हवामान विभागाने सांगितलं आहे.