प्रताप दराडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ३० वर्षीय पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून ती सध्या मुंबईत राहते. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२३ मध्ये मुंबईतील जुहू येथील एका रेस्टॉरंटमध्ये तिची ओळख पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी झाली. त्यावेळी दराडे यांनी तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार अनेक महिने सुरू होता.
advertisement
काही काळानंतर, तरुणीने दराडे यांच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र, दराडे यांनी लग्नास नकार देत त्यांच्यातील संबंध विसरून जाण्यास सांगितले. या घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दराडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर, तोफखाना पोलिसांनी तातडीने दराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मनोर पोलीस करणार आहेत.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे गैरकृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.