शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर ठेवून असल्याच्या चर्चेवरही देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात भाष्य केलं. फडणवीस म्हणाले की, आज राज्यात मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहताहेत. काही लोक म्हणताहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर नजर आहे. होय, आमची नजर आहे पण त्यांना आधार देण्यासाठी आहे. होय, मी पुन्हा येईल म्हणालो होतो. मात्र काहीजणांनी गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्षच घेऊन आलो.
advertisement
अजितदादा भाजपसोबत का गेले? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे काही लोकांच्या पोटात मळमळ आणि कळकळ आहे. पण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे. लोकांपर्यंत जाणारं हे सरकार असून दाराआड बसून फेसबुकवर चालणारं सरकार नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर काळजी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सुदैवाने पाऊस आला तर पिके जगतील. दुष्काळ पडला तर सरकार पूर्ण ताकदीने पाठीशी उभा राहिल. समाजातील वेगवगेळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सरकार गतीशिलतेने काम करतंय. एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही यासाठी काम केलं जात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.
