अजितदादा भाजपसोबत का गेले? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अजित पवार हे भाजपसोबत का गेले, यावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.
पुणे, 17 ऑगस्ट, चंद्रकांत फुंदे : अजित पवार भाजपला पाठिंबा देत सत्तेत का सहभागी झाले, यावर उत्तर देतना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे. अजित पवार हे भाजपसोबत नेमकं कशासाठी गेले ते पहावं लागले. मात्र ते स्वत:च सांगतात विकासासाठी गेलो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार भेटीवर बोलणं देखील टाळलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवार भाजपसोबत का गेले या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली आहे. अजित पवार हे भाजपसोबत का गेले हे पहावं लागेल. मात्र ते म्हणतात की मी विकासासाठी भाजपसोबत गेलो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर बोलणं देखील टाळलं आहे. या भेटीबाबत शरद पवार आणि अजितदादा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मी यावर वेगळं बोलणार नाही. चोरडिया आणि आमच्या कुटुंबाचे फार जुने संबंध आहेत. लोकशाहीमध्ये डायलॉग झालेच पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
advertisement
मलिकांच्या भेटीवर प्रतिक्रिया
दरम्यान नवाब मलिक यांच्या भेटीवर देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मुद्दामहून त्रास देण्यात आला. माझ्यावर संस्कार आहेत, म्हणून मी त्यांच्या तब्यतीची विचारपूस करण्यासाठी गेले. मी तिकडे कोणत्याही राजकीय हेतूनं गेले नाही. नवाब मलिक यांना किती त्रास देण्यात आला, इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीही केलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
August 17, 2023 1:33 PM IST


