शेतकऱ्यांसाठी केंद्र आणी राज्य सरकार विविध कर्ज योजना राबवित असते. त्यामाध्यमातून बँक खात्यात पैसे जमा होतात, तसंच विविध योजनांचा लाभ घेता येतो. मात्र कर्ज घेण्यासाठी गेलेल्या राजू चंद्रकांत शिंदे यांच्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीरामपुर तालुक्यातील नायगाव येथील राजू चंद्रकांत शिंदे हे कर्ज घेण्यासाठी बँकेत गेले होते. त्यांना त्यांच्या नावे 10 लाखांचे कर्ज घेतल्याचे समजले.
advertisement
Amravati : अमरावतीत नेत्यांचा वाद थांबेना, यशोमती ठाकूरांची जीभ घसरली; नवनीत राणांनीही सुनावले
राजू शिंदे यांच्या नावावर असलेल्या कर्जाचे हप्ते ३ वर्षांपासून थकीत असल्याचेही बँकेकडून कळाले. हे ऐकताच शेतकरी राजू शिंदे यांच्या पाया खालची जमीन सरकली. बँकेत खाते उघडण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची लेखी मागणी त्यांनी केली. त्यानंतर १० लाखांचे कर्ज ३ दिवसात निल देखील करण्यात आल्याचं आले. आता राजू शिंदे यांनी माझ्या नावावर 10 लाखांचे कर्ज कोणी काढले , तसेच माझ्या सारख्या आणखी किती लोकांच्या नावावर अशा पध्द्तीने बनावट खाते बनवले गेले? कर्ज काढणारे कोण? याची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपोषण सुरू केलं आहे.
