वडिलांनी आपल्याच दोन मुलांना विहिरीत फेकून देत ठार केलं. रागाच्या भरात व्यक्तीनं हे धक्कादायक पाऊल उचललं. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून नराधम बापानं हे पाऊल उचललं. अहमदनगर मधील या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
VIDEO : खेळताना वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला, आईनं पाहिलं आणि...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे विहिरीत बहीण-भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत पोलीस पाटील विजयकुमार अनारसे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात खबर दिली. विहिरीतील पाण्यात बुडन मृत्यू झालेल्या ऋतुजा गोकुळ क्षीरसागरचं वय 8 वर्ष होतं आणि मुलगा वेदांत गोकुळ क्षीरसागरचं वय 4 वर्ष होतं. दोघेही अळसुंदे, ता. कर्जत, येथे रहायचे.
advertisement
कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे निंबे रस्त्यालगतच्या गोकुळ क्षीरसागर यांच्या विहिरीत मुलीची सँडल दिसत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पाटील यांच्यासह गावातील काही मंडळींनी जाऊन विहिरीच्या पाण्यात काट्या टाकल्या. त्या काट्या वर ओढल्या असता काट्याला गुंतून मुलगी ऋतुजा गोकुळ आणि मुलगा वेदांत गोकुळ क्षीरसागर या बहीण-भावाचा मृतदेह वर आला. मृतदेह मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कर्जत या ठिकाणी आणण्यात आला असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
पत्नी सोबत भांडण झाले म्हणून दोन मुलांना विहिरीत फेकल्याप्रकरणी वडील गोकुळ शिरसागर यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक केली आहे.
