VIDEO : खेळताना वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला, आईनं पाहिलं आणि...
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही.
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक चिमुकला वॉशिंगमशीनमध्ये जाऊन अडकला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषी जाणून घेऊया.
लहान मुलगा वॉशिंगमशीनच्या ड्रायरमध्ये अडकला. त्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्यावर महिला धावत त्याच्याकडे गेली. मुलाला वॉशिंगमशीनमध्ये अडकल्याचं पाहून महिला घाबरली. तिनं मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा प्रयत्न अपयशी ठरला. मग तिनं आपत्कालिन विभागाला कॉल केला. अग्मिशामक दलाचे जवान तिथे पोहोचले. तास भर प्रयत्न केल्यानंतर त्यांनी चिमुकल्याची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
डेली मिररने याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अग्निशामक दलाच्या जवानांनी वॉशिंग मशीन पूर्णपणे खोलून मुलाची सुटका केली. मुलगा अशा प्रकारे वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकला होता की, त्याचे फक्त हात आणि पाय वर दिसत होते. डोकं खाली अडकलं होतं. त्यामुळे त्याला बाहेर काढायला अजून थोडासा जरी उशीर झाला असता तरी त्याचा जीव गेला असता. सुदैवानं त्याला योग्य वेळी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.
advertisement
advertisement
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना पहायला मिळत आहे. यापूर्वीही अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये चिमुकले खेळता खेळता अडचणीत सापडले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2023 9:47 AM IST








