कुत्रा थेट वाघाशीच भिडला, चकमकीचा VIDEO व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
वाघ, सिंह, बिबट्या, जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्याशी वैर घ्यायला बाकीचे प्राणीही घाबरतात. त्यामुळे सहसा त्यांच्याशी पंगा घेण्याचं इतर प्राणी टाळतात.
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : वाघ, सिंह, बिबट्या, जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्याशी वैर घ्यायला बाकीचे प्राणीही घाबरतात. त्यामुळे सहसा त्यांच्याशी पंगा घेण्याचं इतर प्राणी टाळतात. कारण हे धोकादायक प्राणी खूप शक्तिशाली असून क्रूर शिकारीही असतात. कधी कोणावर हल्ला करतील आणि फडशा पाडतील कोणीही सांगू शकत नाही. मात्र वाघासोबत भांडतानाचा कुत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. वाघासमोर कुत्रा धाडसानं जाऊन दोन हात करताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशस मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
वाघ आणि कुत्र्याच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये कुत्र्याचं धाडस पाहून तुम्हीही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. दोघांचं भांडण सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुत्रा आणि वाघ एकमेकांशी भांडताना दिसत आहे. कुत्रा हा माणसाचा मित्र असतो मात्र यामध्ये कुत्र्याने वाघाशीच मैत्री केली आहे. वाघ आणि कुत्रा एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. कुत्रा आक्रमक असतो तर वाघ लढाई टाळण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओच्या सुरुवातीला वाघ पुढे सरकतो, फक्त कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागतो. कुत्राही उडी मारून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागतो. कुत्रा वाघाला घाबरत नाही.
advertisement
advertisement
वाघ आणि कुत्रा दोघेही पाळलेले वाटत आहे. त्यामुळे दोघे भांडण करत खेळत असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. अनेक ठिकाणा वाघांना पाळण्यास परवानगी आहे. wildanimalshorts2. 0 नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, असे प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2023 9:01 AM IST










