नवीन वर्षाचे स्वागत साई दरबारी करता यावे म्हणून साईभक्त शिर्डीत दाखल झाले. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले.
साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने मोठ्या संख्येने साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तर द्वारकामाई परिसरात भाविकांचा उत्साह देखील दिसून आला.
advertisement
भाग्योदय! या जन्मतारखा असणाऱ्यांना पहिल्या दिवसापासून 2025 लकी, धनलाभ
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुद्धा सहपत्नी रात्री बारा वाजता साईबाबांचे दर्शन घेतले. आपल्या वडिलांचं महाराष्ट्रात दुष्काळमुक्त करण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी साई बाबांकडे प्रार्थना केली असल्याचं वक्तव्य यावेळी दर्शनानंतर विखे पाटील यांनी केले.
