Numerology: भाग्योदय! या जन्मतारखा असणाऱ्यांना पहिल्या दिवसापासून 2025 लकी, धनलाभ

Last Updated:

Today Numerology in Marathi 01 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 01 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दिवसभर व्यग्र राहाल असं नियोजन करू नका. मनातले अडथळे बाहेर काढा. अनावश्यक वाद टाळा. डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे विश्रांती घ्या. एखादी धर्मादाय संस्था किंवा गरजू व्यक्तीला दान कराल. मनातील प्रश्न सुटतील.
Lucky Number : 18
Lucky Colour : Purple
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
तुमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. काही लाभार्थी तुम्हाला कृतघ्न वाटतील. स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराला तुमची उणीव भासेल. त्यामुळे जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
Lucky Number : 8
Lucky Colour : Parrot Green
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
तुमचा इतरांवर चांगला प्रभाव असेल. सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रभाव दिसेल. तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. बँकिंग, विमा किंवा आर्थिक व्यवहारासाठी दिवस चांगला आहे. तात्पुरतं आकर्षण आणि स्थिर प्रेम यातला फरक समजेल.
Lucky Number : 3
Lucky Colour : Electric Blue
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
कठोर परिश्रमातून यश मिळेल. वैयक्तिक लाभ प्रेरणादायी ठरतील. आरोग्य चांगलं राहील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तुमचा व्यावसायिक संपर्क वाढवा. नात्यासाठी दिवस चांगला असेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. राग टाळा.
Lucky Number : 18
Lucky Colour : Magenta
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
भावंडांकडून मदत मिळणार नाही. तुम्ही चिंताग्रस्त असाल. आरोग्य चांगलं असल्याने दिवस उत्साहात जाईल. व्यवसायात कर्ज देणं टाळा. प्रिय व्यक्तीसोबतच्या नातेसंबंधांत दरी निर्माण होईल. तुम्हाला नातं टिकवण्यासाठी त्यावर काम करावं लागेल.
Lucky Number : 5
Lucky Colour : Bottle Green
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अधिकारी व्यक्तींमुळे तुम्हाला करिअरमध्ये फायदा होईल. दिवस शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारा आहे. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आराम करा. खर्च वाढल्याने गरजा भागवणं कठीण होईल. संध्याकाळी जोडीदारासोबत निवांत वेळ घालवाल. दिवसभराचा तणाव दूर करण्यासाठी हा योग्य उपाय ठरेल.
advertisement
Lucky Number : 7
Lucky Colour : Lemon
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला कितीही त्रास जाणवत असला तरी तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देऊ शकणार नाही. कविता आणि साहित्य संमेलनाविषयी रुची वाढेल. तुम्ही घर किंवा कारविक्रीचा निर्णय घेऊ शकाल. कर्ज घ्यावं लागू शकतं. सुरुवातीला संकोच वाटला तरी रोमँटिक अनुभव घेऊ शकाल.
Lucky Number : 8
Lucky Colour : Lavender
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अनावश्यक वादात पडणं टाळा. तुम्हाला एखाद्या स्थितीत अडकल्यासारखं वाटेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटेल. फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. विनाकारण खर्च टाळा. भविष्यासाठी बचत करा. विवाहाची तारीख निश्चित करण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number : 5
Lucky Colour : Magenta
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
महत्त्वाच्या प्रकल्पात अडथळा येऊ शकतो; पण धीर धरा. दूरच्या व्यक्तीशी साधलेला संवाद फायदेशीर ठरल्याने तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातल्या सदस्याचं आरोग्य बिघडू शकतं. मेहनतीचं फळ मिळेल. मोठा धनलाभ होऊ शकतो. जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव जाणवेल; पण थोडा धीर धरा.
Lucky Number :17
Lucky Colour : Electric Gray
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: भाग्योदय! या जन्मतारखा असणाऱ्यांना पहिल्या दिवसापासून 2025 लकी, धनलाभ
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement