नेमंक काय म्हणाले दरेकर
जो पक्ष विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही, तो लोकसभेच्या 24 जागा कशा जिंकणार असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्याच्यामध्ये समन्वय आणि एकवाक्यता नाही. आमच्याशी लढताना ते विरोधी पक्षनेता ठरू शकत नाहीयेत. त्यांची हातबलता समोर आली आहे. विरोधी पक्षनेता निवडीच्या दिवशी काँग्रेसमध्ये मोठा स्फोट होणार आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावाही यावेळी दरेकर यांनी केला आहे.
advertisement
भिडे गुरुजींचा भाजपशी संबंध नाही, फडणवीसांनी केला त्या वक्तव्याचा निषेध; काँग्रेसलाही इशारा
उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पहिल्यांदा मराठी माणसांचा मेळावा घ्यायला हवा होता. मात्र मराठी माणसं जमतील का नाही यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला, असा खोचक टोला दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
