शिर्डी विमानतळाजवळ शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी ३० हजारहून अधिक लाभार्थी उपस्थित राहिले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांसह नेत्यांनीही उपस्थिती लावलीय.
'राहुल गांधीचं आडनाव खान आहे'; शरद पोंक्षेंची थेट गांधी घराण्यावर टीका
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एसटी बसेस अभावी विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल पाहून स्वत: आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. विद्यार्थ्यांना बस नसल्याने बराच वेळ गाडीची वाट पाहत बसावं लागलं होतं. बस नसल्याने काही विद्यार्थी चालत शाळेला निघाले होते.
विद्यार्थीनी बसची वाट पाहत उभ्या असल्याचं आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिसलं. त्यांनी विद्यार्थीनींची विचारपूस केली. बस नसल्याने शाळेला चालत जावं लागणार असल्याचं विद्यार्थीनींनी सांगितलं. तेव्हा आमदार तनपुरे स्वत: गाडीतून खाली उतरले. त्यांनी विद्यार्थीनींना आपल्या गाडीतून शाळेत सोडण्यास चालकाला सांगितले. पुन्हा विद्यार्थ्यांनाही त्यांनी स्वत: शाळेत सोडलं. आता त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
