Sharad Ponkshe : 'राहुल गांधीचं आडनाव खान आहे'; शरद पोंक्षेंची थेट गांधी घराण्यावर टीका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्त मालेगावला भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृती साठी सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
बब्बू शेख: प्रतिनिधी
मुंबई, 17 ऑगस्ट : राहुल गांधी यांचे खरे आडनाव 'खान' असून त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन गांधी नाव मिळविले असें वादग्रस्त वक्तव्य अभिनेते शरद पोक्षे यांनी केलं आहे. मालेगाव येथीस एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्त मालेगावला भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृती साठी सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर टिका केली.
advertisement
यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत हे खरच गांधी आहे का असा सवाल केला आहे. राहुल गांधी यांचे मुळ नाव खान असल्याची टिका करत राफेल प्रकरणात सुध्दा सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जो पर्यंत अपिल करण्याची संधी आहे तो पर्यंत कोर्टात हे माफी मागीत असता. सावरकर प्रकरणात हेच झाले एकतर तु गांधी नाही आणि सावरकर पण नाही हे काही ओरिजनल गांधी नाही तर खान आहे. हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. ही फिरोज खान यांची पुढची पिळावळ आहे. हा इतिहास आहे. मुर्खाला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार अशी टिका शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात केली.
advertisement
अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच आपली स्पष्ट भुमिका मांडत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सातत्यानं चर्चेत येत असतात. शरद पोंक्षे मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातून रंगभूमी गाजवली होती. त्यांचं हे अजरामर नाटकं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नुकतीच त्यांची याची घोषणा केली आहे.
advertisement
2018मध्ये शरद पोंक्षे यांनी काही कारणास्तव मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक बंद करण्याची घोषणा केली होती. 'मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही' असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर आता तब्बल 4 वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. आता नथुराम गोडसेंची भुमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2023 11:47 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sharad Ponkshe : 'राहुल गांधीचं आडनाव खान आहे'; शरद पोंक्षेंची थेट गांधी घराण्यावर टीका


