उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच चाकण एमआयडीसी जवळी भागाला भेट दिली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी होत असते. या भाागाते अनेक लहान मोठे उद्योगधंदे आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी पाहणी दौरा केला.
पोलीस आयुक्तांवर अजितदादा संतापले...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असा सवाल केला. अजित पवारांचा पाहणी दौरा सुरू होता. त्यावेळी वाहतूक रहदारी थांबवण्यात आली होती. यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यावर संताप व्यक्त केला. 'ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीय?, सगळी वाहतूक सुरु करा', अशा शब्दात अजित पवारांनी त्यांना सुनावले.
advertisement
अजित पवारांनी वाहतूक कोंडीवर काय म्हटले?
दरम्यान, अजित पवार यांनी म्हटले की, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असे त्यांनी म्हटले.