राष्ट्रवादीमध्ये उभी फुटल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,साखर कारखान्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. माळेगाव येथील साखर कारखान्याच्या प्रश्नावर काका आणि पुतण्याची तब्बल तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे, काकांची भेट घेण्यासाठी अजित पवार थेट वाय बी चव्हाण सेंटरवर पोहचले होते. या बैठकीतला तपशील अजून बाहेर आला नाही, मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
विशेष म्हणजे, अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेणे ही आता नवीन गोष्ट राहिली नाही.
वर्षभरातील तिसरी भेट
अलीकडेच जानेवारी महिन्यात शरद पवार आणि अजित पवार बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतणे एकत्र आले होते. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, त्याच मंच्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होती. दोघींच्या खुर्च्या एकमेकांशेजारी होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजित पवार आणि शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये १५ ते २० मिनिटं चर्चा झाली होती.