वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक्स (ट्विटर)वर केलेल्या ट्विटमध्ये संबंधित विमान VSR Aviation कंपनीच्या मालकीचे असल्याचे म्हटले. सेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये या कंपनीवर गंभीर आरोप करत, यापूर्वीही या कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. तसेच, या चार्टर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुहेल सेठ यांनी कंपनीच्या मालकांवर गंभीर आरोप केले. आपल्या ट्वीटमध्ये सुहेल सेठ म्हणाले की, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचे होते. ही कंपनी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या कंपनीच्या दुसऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवत असून ते लोकांना DGCA India हे आमच्या खिशात आहे असे सांगतात. ही चार्टर विमान कंपनी बंद झाली पाहिजे असे सेठ यांनी म्हटले.
advertisement
तेहसीन पुनावाला यांनीदेखील ट्वीट केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये याच कंपनीच्या विमानाचा यापूर्वी अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते. ते विमान VSR Aviation चे होते. कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झालं असल्याचं त्यांनी म्हटले. मागील काही वर्षात विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. यात आता डीजीसीएने लक्ष घालून कठोर पावले उचलण्याची मागणी पुनावाला यांनी केली.
२०२३ सालीही झाला होता असाच अपघात
VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL हे खासगी विमान मुंबईत १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विमानतळावर कोसळले होते. खराब हवामानाचं कारण देत हा विमान अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ३ जण जखमी झाले होते. या विमानाचा अपघातही लँडिंग करताना झाले होते. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले होते.
