अजित पवार म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे मला टार्गेट करतो.टीका करतो. माझ्या जॅकेटबद्दल बोलतो. या महाराजने आधी मनसे, नंतर ठाकरेकडे गेला. 2014 मध्ये त्यांनी लोकसभेत भाजपचे काम केलं. कोल्हे साहेबांना ते सगळं चाललं. तिकीट मिळत नव्हतं तेव्हा ठाकरेंना जय महाराष्ट्र केलं आणि आमच्याकडे आलं. त्या बाबाला मी उमेदवारी दिली. माझ्या गाडीत घेऊन गेलोआणि पक्षप्रेवश केला. आधी पवार साहेबांवर टीका केली. अशा पद्धतीने निष्ठा बदलणारी ही व्यक्ती याला नैतिक अधिकार आहे का?
advertisement
अजित पवारांनी अखेर जॅकेटचा खरा रंग सांगितला
शिरुरचे विद्यमान खासदार त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. परंतु रोज सभा असली की गुलाबी जॅकेट... आता तर त्यांचा इतिहास मी सांगतो. त्यांना कोणतीरी सांगा किंवा चष्मा बदला... माझं जॅकेट गुलाबी नाही.. त्याचा रंग जांभूळ खाल्ल्यानंतर त्याची बी जशी असते त्याचा जो रंग आहे तो त्या जॅकेटचा रंग आहे.सतत माझ्या निष्टेबद्दल बोलत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचा कोल्हेंना सल्ला
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता त्यामुळे सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. या पद्धतीने काय चालले? अशी टीका करुन यातून काय मिळणार आहे. शिरुर तालुक्यातील लोकांचे प्रश्न सुटणार आहे का?, असे देखील अजित पवार म्हणाले.