गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून पवार काका पुतण्यामध्ये हे वाकयुद्ध रंगलं आहे. जस जसे घायवळचे राजकीय लागेबांधे उघड होऊ लागलेत तसं तसे आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. गुंड घायवळचा राजकीय गॉडफादर कोण? यावरून हा राजकीय वाद पेटलाय.पण त्यावरून आता पवार काका पुतण्यात वादाची ठिणगी पडली आहे. रोहित पवारांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपनं रोहित पवारांसोबत सचिन घायवळचा एक फोटो प्रसिद्धी माध्यमांसमोर आणला. तर त्यानंतर रोहित पवारांच्या आईनं कोरोना काळात निलेश घायवळचं कौतुक केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
advertisement
रोहित पवार आणि भाजपात वाद पेटला
एकीकडं रोहित पवार आणि भाजपात वाद पेटला असतानाचं दुसरीकडं अजित पवारांनी पुतण्या रोहित पवारांना त्याच कौतुकाच्या व्हिडीओवरून टोमणा मारला. आता घायवळच्या वादावरून पवार काका पुतण्यात राजकीय भाऊबंदकी सुरु झालीय. काका अजित पवारांच्या त्या टोमण्याला पुतण्या रोहित पवारांनी हे प्रत्युत्तर दिलंय.
काका-पुतण्यांमध्ये जुगलबंदी
पुण्यात गुंड निलेश घायवळी टोळी सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वीच तो परदेशात पसार झालाय. पण त्याचे सर्वपक्षिय नेत्यांशी असलेले लागेबांधे आता लपून राहिले नाहीत. निलेश घायवळच्या आडून आपल्या राजकीय विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जातोय. अशातचं पवार काका-पुतण्यांमध्ये जुगलबंदी रंगलीय.