पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेमध्ये आयोजित नियामक मंडळाच्या बैठकीस अजित पवार उपस्थित होते. याप्रसंगी साखर अभियांत्रिकी व अक्षय ऊर्जा, साखर तंत्रज्ञान, मद्यार्क तंत्रज्ञान, तसेच कृषी आणि ऊस शेती क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर या विषयांवरील चर्चासत्र अजित पवार यांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील उपस्थित होते.
advertisement
बैठकीदरम्यान ऊस उत्पादनात वाढीसाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
राजकीय द्वेष न आणता चांगल्या कारखान्याची निवड करतो, तुम्ही ऊसाची लागवड करा
जयंत पाटील, राजेश टोपे तुम्ही देखील ऊसाची शंभर टक्के लागवड करा. आपण केले तरच लोकांना सांगू शकतो. राज्यातील आठ साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मदत करण्याचे सांगितले आहे. केवळ त्या कारखान्यांचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे अशी अट आहे. यामध्ये कुठलेही राजकीय द्वेष न आणता चांगल्या कारखान्याची निवड केली जाईल, असे सांगत कारखान्यातील इतर प्रकल्पांनाही कमी व्याजाने पैसे देणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण कारखान्यांचे रेकॉर्ड चांगले ठेवा, असे अजित पवार म्हणाले.