सुरेश धस यांनी नाव घेतल्यामुळे प्राजक्ता माळी आक्रमक झाली असून तिने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना माफी मागायला सांगितली आहे. तसंच प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. याशिवाय आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही प्राजक्ता माळी म्हणाली आहे.
अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
दरम्यान सुरेश धस आणि प्राजक्ता माळी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांचं स्टेटमेंट सरळ स्पष्ट आहे, त्यात कुठेही शिंतवडे उडवण्याचा प्रयत्न झाला नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले आहे.
advertisement
'सुरेश धस यांचं स्टेटमेंट मी बघितलं, ते स्टेटमेंट इव्हेंट पॉलिटिक्स कुणाला शिकायचं असेल, तर कुठल्या इव्हेंटसाठी कोण सेलिब्रिटी बोलावतं, इथपर्यंत सुरेश धस यांचं स्टेटमेंट होतं. आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्वीस्ट करायची आवश्यकता मला भासत नाही. सुरेश धस यांचं स्टेटमेंट मी ऐकलं, त्यात कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाल्याचं मला जाणवलं नाही. इव्हेंटच्या संदर्भात त्या परळीला येतात, हे स्टेटमेंट मी ऐकलं, या पलीकडे काही स्टेटमेंट असेल तर आणि शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला असेल, तर तो केवळ अभिनेत्री नाही तर कुणाच्याही बाबतीत होऊ नये. मला सुरेश धस यांचं स्टेटमेंट स्पष्ट, सरळ दिसलं', असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं आहे.