याआधी 2014 आणि 2019 ला राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि झालंही तसंच. यंदा त्या भाजपच्या तिकीटावर लोकसभेतच्या रिंगणात उतरल्या आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राणा कुठल्या पक्षाच्या तिकीटावर लढत आहेत.
advertisement
त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. त्यामुळे अमरावतीची ही निवडणूक काहीश्या नाराजीच्या वातावरणाभोवती फिरल्याचं पाहायला मिळालं.
2004 ते 2014 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समर्थनावर निवडून आल्या होत्या.
