अमरावती - अमरावती जिल्ह्यात यावर्षी मिरची पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काही मोजक्या लोकांची मिरची बऱ्यापैकी आहे. तर अनेकांनी मिरची उपटून फेकली आहे. अती पाऊस, सदोष मिरचीचे रोप, मिरचीच्या लागवडीमध्ये उशीर, चुकीच्या पद्धतीने लागवड ही मिरची पिकाचे नुकसान होण्याची कारणे आहेत. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, ते आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
अमरावती येथील कृषीतज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मिरची पिकाचे नुकसान होण्यापासून वाचवायचे असेल तर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात आधी मिरचीचे रोप महत्वाचे आहेत. आपण मिरचीचे रोप आणले ते नेमके कसे आहे? ते सदोष आहेत का? या सर्व गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. काही वेळा मिरचीचे रोपच खराब असल्याने मिरची पिकाचे नुकसान होते.
रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO
- त्याचबरोबर मिरची पिकाची लागवड योग्य त्या वेळी करायला पाहिजे. खरीप हंगामातील असेल तर जून ते जुलैमध्ये लागवड करायला पाहिजे. उन्हाळी असेल तर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये लागवड करायला हवी.
- मिरची पिकाची लागवड बेडवर करायला पाहिजे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर मिरचीवर काही रोग येतोय का? हे तपासून त्यावर योग्य ती फवारणी करणेसुद्धा महत्वाचे आहे.
- त्याचबरोबर खत, फवारणी अती प्रमाणात न करता त्याचे योग्य प्रमाण ठरवून घेतले पाहिजे. जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करण्यात आला पाहिजे.
- मिरचीला फळ येण्यास सुरुवात झाली की त्याला आधाराची गरज असते. आधार दिल्यास मिरची खाली घोळत नाही. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळण्यास मदत होते. अशी काळजी घेतल्यास मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मदत होते.