TRENDING:

खान्देश आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा हवामान अपडेट

Last Updated:

खान्देश आणि मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील तापमानात अंशतः घट बघायला मिळत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. उन्हाचे चटके, ढगाळ वातावरण आणि आता पावसाची शक्यता, संमिश्र वातावरण तयार होत असल्यानं वातावरणातील दमटपणा वाढायला सुरवात झाली आहे. राज्यातील तापमानात अंशतः घट बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे खान्देश आणि मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. पाहुयात राज्यातील इतर प्रमुख शहरांतील तापमान आणि हवामान कसं असेल.
advertisement

मुंबईसह उपनगरात 20 मार्चला अंशतः ढगाळ आकाश असू शकतं. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात आणखी अंशतः घट बघायला मिळत आहे. दोन दिवसांत तेथील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

रंगांची उधळण अन् बैलगाडीतून मिरवणूक, सोलापुरात लोधी समाजाची अनोखी रंगपंचमी, Video

advertisement

पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात देखील अंशतः घट बघायला मिळत आहे. त्याठिकाणी 20 मार्चला सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये 20 मार्चला दुपारी किंवा संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर धील तापमानात काहीशी घट झालेली दिसून येत आहे. मात्र पुढील काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

नाशिकमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 20 मार्चला त्याठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात देखील अंशतः घट झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

नागपूरमध्ये 20 मार्चला अंशतः ढगाळ आकाश राहून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तेथील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

राज्यातील तापमानात अंशतः घट झालेली पाहायला मिळत आहे. तर 20 मार्चला धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उन्हाचा पारा आणि पावसाची शक्यता असल्यान नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
खान्देश आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल