अमरावती: दसऱ्याची पूजा आणि तोरण यासाठी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी दसरा दिवाळीला मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढते. यावर्षी सुद्धा फुलांची मागणी वाढली आहे. अमरावतीतील फुलांच्या बाजारात फुले आणि फुलांच्या हारांच्या किमतीत मोठी वाढ झालीये. 30 रुपये किलोपर्यंत मिळणारी झेंडूची फुले आता 80 ते 90 रुपये किलोनी मिळत आहेत. अमरावती फूल बाजारात कोणत्या फुलांना काय दर आहेत? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी आणि किंमत दोन्ही वाढल्या आहेत. सध्या जास्त झेंडूच्या फुलांची मागणी आहे. फुलविक्रेता उमेश बरबट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "झेंडूच्या फुलांच्या किमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे. 4 दिवसांआधी 30 रुपये किलो मिळणारी झेंडूची फुलं आता 80 ते 90 रुपये किलो मिळत आहेत."
नाशिकमध्ये एमबीएचे विद्यार्थी विकतायेत झेंडुची फुले, काय आहे यामागचं नेमकं कारण?
दिवाळीपर्यंत फुलं भाव खाणार
शेवंतीची फुले ही 200 रुपये किलो होती आणि आता ती 600 रुपये किलो झालेली आहे. तब्बल 400 रुपयांनी वाढ शेवंतीच्या किमतीमध्ये झाली आहे. इतर फुलांच्या किमतीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुलाब, अश्टर, निशिगंधा, शेवंती, झेंडू या सर्व फुलांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जशी फुलांची किंमत वाढली तशीच दिवाळीच्या तोंडावर सुद्धा फुलांची किंमत अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांनी स्वतः बाजारात विकायला आणलेली फुलं ही कमी भावात विकत असल्याचे दिसून येत आहे. ज्या फुलांची क्वालिटी चांगली असेल ती फुलं 50 रुपये किलो नंतर जसजशी क्वालिटी घसरत जाईल तशी किंमत सुद्धा घसरत जात आहे. या वर्षी सर्वच फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळत आहे.