TRENDING:

Ravi Rana : 'आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये' आमदार रवी राणा यांचं धक्कादायक विधान

Last Updated:

Ravi Rana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. एकीकडे सत्ताधारी लोकांकडून या योजनेच्या प्रचारावर लाखो रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. अशात अपक्ष आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं आहे.
News18
News18
advertisement

तर पैसे परत घेतले जाणार : रवी राणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. तर सरकार देत राहते. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं मत रवी राणा यांनी मांडले.

advertisement

वाचा - 'तर मराठे नक्षलवादी होऊन' आरक्षणावरुन छावा संघटना आक्रमक, सरकारला दिला इशारा

लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी (Ajit Pawar) मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Ravi Rana : 'आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये' आमदार रवी राणा यांचं धक्कादायक विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल