Maratha Reservation : 'तर मराठे नक्षलवादी होऊन' आरक्षणावरुन छावा संघटना आक्रमक, सरकारला दिला इशारा

Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता छावा संघटना आक्रमक झाली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

News18
News18
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणावरुन राज्यात राजकारण तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील जिल्ह्याजिल्ह्यात शांतता रॅली काढत आहेत. दुसरीकडे सरकारकडून वारंवार वेळ वाढवून घेतला जात आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी जरांगे पाटील करत आहे. दुसरीकडे आरक्षणासाठीच्या लढ्याचा आणि समाजाचा राजकीय उपयोग करून घ्याल तर ठोकूण काढणार, असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. आचार संहिता लागण्याआधी जर आरक्षण दिलं नाही तर नक्षलवादी होऊन तुमचा काटा मराठे काढतील, असा इशाराच छावा संघटनेने दिला आहे.
छावा संघटनेचा सरकारला इशारा
आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बगल देण्यासाठी सुपारी फेक, शेण फेक अशा घटना घडवून लक्ष दुसरीकडे वळविळ्याचा प्रयत्न होत आहे. जर समाजाचा आणि आरक्षणासाठीच्या लढाईचा उपयोग राजकारण करण्यासाठी कोणी करत असेल तर छावा संघटना त्यांना ठोकून काढेल, असा आक्रमक इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासोबतच जर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आत आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादी होतील आणि तुमचा काटा काढतील, असा देखील इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबरोबर ओबीसीमधुनच नाही तर कुठूनही आरक्षण द्या अस देखील यावेळी छवाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला जाहीर करणार भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढू शकतात. त्यांनी स्वतः निवडणूक लढविण्याचे संकेतही दिले आहेत. जरांगे म्हणाले की, राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक होणार असून, सर्व जागांवर मराठा उमेदवार विजयी होतील. इतर राखीव जागांवर इतर जातीचे उमेदवार निवडले जातील. मी निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Maratha Reservation : 'तर मराठे नक्षलवादी होऊन' आरक्षणावरुन छावा संघटना आक्रमक, सरकारला दिला इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement