रोज रोज फराळ खाऊन कंटाळलात? झटपट बनवा “cheese corn omelette”; 10 मिनिटात बनेल टेस्टी नाश्ता
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
घरच्याघरी मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी झटपट आणि पौष्टिक नाश्ता बनवता आला, तर किती छान! म्हणूनच शेफ विशाल यांनी खास या निमित्ताने “चीज कॉर्न ऑम्लेट”ची सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगितली आहे.
मुंबई: दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या की लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. फटाके फोडणं, खेळ खेळणं आणि दिवसभर धमाल करणं या सगळ्या गोंधळात पालकांना मात्र एक मोठं टेन्शन येतं, ते म्हणजे मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी भूक लागल्यावर पटकन काय द्यायचं? फराळ तर असतोच, पण रोज रोज तोच फराळ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. सुट्टीच्या दिवसांत लहान मुलं कमालीचे खाण्यासाठी हट्ट करतात. अशावेळी घरच्याघरी मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी झटपट आणि पौष्टिक नाश्ता बनवता आला, तर किती छान! म्हणूनच शेफ विशाल यांनी खास या निमित्ताने “चीज कॉर्न ऑम्लेट”ची सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगितली आहे.
सर्वप्रथम “चीज कॉर्न ऑम्लेट” ही झटपट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. दोन अंडी, दोन ब्रेडचे स्लाईस, एक चीज क्यूब, थोडं बटर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, तिखट आणि मसाला चवीनुसार आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर असं साहित्य या रेसिपीसाठी लागतंय. अवघ्या काही मिनिटातच बनणारी ही रेसिपी आपल्या चिमुकल्यांच्या नक्कीच तोंडाचे चोचले पूर्ण करणार हे नक्की. अवघ्या काही मिनिटातच हा चमचमीत पदार्थ बनणारा आहे. या पदार्थासाठी तुम्हाला जवळपास 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागेल. जर तुमच्याकडे साहित्यामध्ये सांगितलेले सर्व पदार्थ असतील तर, अवघ्या काही मिनिटातच हा पदार्थ बनून तयार असेल.
advertisement
“चीज कॉर्न ऑम्लेट” या पदार्थाचे साहित्य जाणून घेतल्यानंतर त्याची सोपी आणि चविष्ट रेसिपी जाणून घेऊया. सर्वप्रथम दोन अंडी फोडून एका बाऊलमध्ये घ्या. त्यात मीठ, तिखट, मसाला, कांदा, टोमॅटो आणि मक्याचे दाणे टाकून चांगलं फेटून घ्या. गरम तव्यावर थोडं बटर पसरवा आणि ऑम्लेट बनवायला सुरुवात करा. आता त्यावर दोन ब्रेडचे स्लाईस ठेवा आणि उलट सुलट करून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. ऑम्लेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचं झालं की ते ताटात काढा. शेवटी किसलेलं चीज वरून टाका आणि गरम ऑम्लेटवर टाकल्यामुळे चीज लगेच वितळतं आणि नंतर त्या ऑम्लेटला मिळतो ‘चीजचा’ परफेक्ट ट्विस्ट. अवघ्या काही मिनिटातच “चीज कॉर्न ऑम्लेट” पदार्थ बनून रेडी होईल. फक्त चिमुकल्यांनाच नाही तर, सर्वच वयोगटातल्यांना आवडणारा पदार्थ आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
रोज रोज फराळ खाऊन कंटाळलात? झटपट बनवा “cheese corn omelette”; 10 मिनिटात बनेल टेस्टी नाश्ता

