मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
'नवाब मलिक यांच्यावरील गंभीर स्वरूपाचे आरोप असून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. मलिकांना कोर्टानं अद्याप निर्दोष ठरविलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरून नाही. महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयानं एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे. जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील', अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
शिंदे आणि फडणवीसांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांची ऐन विधिमंडळ अधिवेशनात चांगलीचं कोंडी झालीय.त्यामुळे अजित पवार काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय.
मलिकांनंतर आता पटेल रडारवर, दानवेंनी काढलं इकबाल मिर्ची कनेक्शन
अजित पवार काय म्हणाले?
मलिकांची भूमिका पहिल्यांदा ऐकेन त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, कुणी कुठे बसावं हा अध्यक्षांचा अधिकार आहे असंही ठामपणे अजित पवारांनी सांगितलंय. मलिक प्रकरणी फडणवीसांनी अजित पवारांना केवळ पत्र लिहिलं असं नाही तर ते सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अजित पवार गटाची नाराजी लपून राहिली नाही. अशा प्रकारे पत्र लिहून ते सार्वजनिक केलं नसतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
शिरसाटांचं एक पाऊल पुढे
दरम्यान नवाब मलिक वादात संजय शिरसाट यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 'आमची भूमिका स्पष्ट आहे, पहिले स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे. गुंड असला तरी चालतो, पण तो अरुण गवळीसारखा असला पाहिजे, जी शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे, ती भूमिका आजही आमची आहे. आम्हाला राजन चालेल पण नवाब नाही चालत, जो दाऊदबरोबर राहणारा आहे. ही आमची भूमिका आहे. ही सत्ता काय आमच्यासाठी महत्त्वाची आहे का? काही फरक पडत नाही आम्हाला सत्तेचा', असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.