चिंबोरी मसाला बनवण्याची पद्धत (साहित्य आणि कृती)
साहित्य
- साफ केलेले अर्धा किलो चिंबोऱ्या किंवा खेकडे
- 1मोठा कांदा, बारीक चिरलेला
- 1 मध्यम कांदा, उभा चिरलेला
- ओले किंवा सुके खोबरे (किसलेले)
- आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
- आगरी मसाला ,लाल तिखट
- हळद
- लिंबा एवढा चिंचेचा कोळ किंवा आंबोशी, टोमॅटो
- तेल
- चवीनुसार मीठ
- चिरलेली कोथिंबीर
- इतर गरम मसाले- धने, शहाजिरे, लवंग, काळेमिरे, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडे आणि इलायची
advertisement
कृती
- मसाला तयार करणे- खोबरे, कांदा आणि सर्व गरम मसाले (धने, शहाजिरे, लवंग, वेलदोडे इ.) मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- चिंबोरी तयार करणे- चिंबोऱ्या स्वच्छ धुवून साफ करून घेणे. एका भांड्यात तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्या. मग आले-लसूण पेस्ट घाला.
- मसाले घालणे- हळद, लाल तिखट आगरी मसाला आणि तयार केलेला वाटलेला मसाला घाला. तेल सुटेपर्यंत परता.
- चिंबोऱ्या घालणे- स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्या त्यात घालून चांगले मिसळा.
- इतर साहित्य घालणे- चिंचेचा कोळ, मीठ आणि पाणी घाला.
- शिजवणे- चिंबोऱ्या शिजत आल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
November 11, 2025 7:29 PM IST