रविवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्पनाची सध्या सिडको पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एटीएसकडून चौकशी सुरू आहे. बुधवारी तिच्या पोलिस कोठडीत 10 दिवसांची वाढ झाली. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तसेच एटीएस, गुप्तचर यंत्रणांनी 2 तास चौकशी केली. सायंकाळी पुन्हा सर्वांनी एकत्रित चौकशी करीत तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या खूप ओळखी आहेत, अनेक देशांत माझ्या परिचयाची माणसे, अधिकारी आहेत, असे ती सांगते. तपास यंत्रणांनी तिच्या प्रत्येक उत्तराची खातरजमा करणे सुरू केले आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत.
advertisement
अफगाणी बॉयफ्रेंड ते माय लव्हली हजबंड, तोतया IAS 'कल्पना'च्या मोबाईलमधून शॉकिंग खुलासा, पाकिस्तान...
मोबाईलमधून धक्कादायक माहिती
कल्पनाच्या मोबाइलमध्ये अनेक मोबाइल क्रमांकांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने नंबर सेव्ह आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याची माहिती काढली जात होती. दिल्लीकडून प्राप्त माहितीनुसार, सदर व्यक्तीने मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाचा वापर करून त्यानेही अधिकारी असल्याचा बनाव रचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कल्पना व अशा अनेक तोतया अधिकाऱ्यांचे सिंडिकेटच ऑपरेट होत असल्याचा कयास आहे.
कल्पनाच्या दाव्यानुसार, त्याची आणि तिची दिल्लीत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. तो उत्तर भारतीय असल्याचे समोर आले आहे. कल्पनाच्या अटकेनंतर पाठ फिरवलेल्या हडकोतील तिचा भाऊ बुधवारी रात्री ठाण्यात हजर झाला. तेव्हा तिच्या आईलादेखील ठाण्यात बोलावण्यात आले होते. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी दोघांची चौकशी केली. शिवाय, हॉटेल व्यवस्थापकाचाही जबाब नोंदवला.
‘कल्पना भागवत’चा अफगाणी बॉयफ्रेंड 7 वर्षांपासून भारतात, चौकशीतून धक्कादायक कांड समोर
कल्पनाच्या डिमांड
क्रांती चौक ठाण्याच्या कोठडीत असलेल्या कल्पनाचे नखरे मात्र सुरूच आहेत. कधी लस्सी, तर कधी तिला हवा असणाऱ्या पदार्थाची मागणी करून ती पोलिसांना हैराण करत आहे. बी.एस्सी. पदवीधर कल्पनाने महाविद्यालयीन काळात एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. एकदा तिने यूपीएससीची पूर्वपरीक्षादेखील दिली व उत्तीर्ण केली होती.
विद्यापीठानं कामावरून काढून टाकलं
कल्पनाने एम.एस्सी.ला प्रवेश घेऊन शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर 2013 मध्ये विद्यापीठाच्या भरतीमध्ये ती लिपिक म्हणून रुजू झाली. मात्र, कामावर गैरहजर राहिली. 2021 मध्ये तिला विद्यापीठ प्रशासनाने बडतर्फ केले. त्यानंतर तिने स्वतःला आयएएस अधिकारी म्हणून मिरवण्यास सुरुवात केली. अनेकदा दिल्लीत जाऊन तिने महाराष्ट्र सदनमध्ये मुक्काम ठोकला. तेथे अनेकांच्या भेटी घेत होती. याच छबीचा आधार घेत ती अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात आल्याचेही तपासात पुढे आले.
दिल्ली बॉम्बस्फोटावेळी दिल्लीत
10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ उभ्या कारमध्ये स्फोट झाला. यात 10 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, तर 20 हून अधिक जखमी झाले. याच दरम्यान कल्पनाचा दिल्लीत प्रवास झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत वास्तव्यादरम्यान कल्पनाला अनेकदा महाराष्ट्र सदनमध्ये पाहण्यात आले. बॉम्बस्फोटाच्या दरम्यानच कल्पनाचे दिल्लीतील वास्तव्य योगायोग होता की आणखी काही, या दिशेने दिल्लीस्थित गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.
कल्पनाने एक मोबाइलही नष्ट केल्याचा संशय आहे. तिच्या मोबाइलमध्ये बुधवारी पाकिस्तानच्या अफगाण एम्बॉसिंग, पेशावर कैटॉन्मेंट बोर्ड, झरदारी सर वाइफ, अफगाणिस्तान अॅम्बॅसी, मुजीबभाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्ची असे 11 क्रमांक आढळले. मात्र, तिच्या मोबाइलमध्ये सौदी अरेबिया, बांगलादेशच्याही अनेकांच्या नावाने क्रमांक असल्याचे गुरुवारी समोर आले. त्याविषयीही कल्पना गोलमाल उत्तर देत आहे.






