सर्वात पहिले तर तुम्ही सायरन वाजल्यानंतर पॅनिक होऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका आणि पळापळी देखील करू नका. मॉकड्रिलच्या काळामध्ये जर तुम्ही थेटर, मॉल किंवा डी मार्ट किंवा कुठल्याही शॉपिंगच्या ठिकाणी जर अडकले असाल तर अशावेळी सायरन वाजल्यास, प्रथम शांत राहा आणि सुरक्षित ठिकाणी जा. मॉलमध्ये सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दिलेले निर्देश किंवा मार्गदर्शनाचे पालन करा. सायरन वाजल्यास, तातडीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. ज्या पण इमारतीमध्ये असलेल्या सुरक्षित ठिकाणी जा आणि तेथील सूचनांचे पालन करा. तसेच तुम्ही थेटरमध्ये असल्यास शांत राहा. सायरन वाजल्यास, गोंधळ करू नका. सूचनेचे पालन करा.
advertisement
Mock Drill : मॅाकड्रिल सुरू झालं तर तुमच्या सोसायटीमध्ये काय करायचं? अशी आहे नियमावली
तसंच जोपर्यंत सायरन हा बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडू नका. ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी शांत उभ रहा आणि सुरक्षित ठिकाणी उभे राहावं. थिएटर, मॉल किंवा डी मार्ट अशा ठिकाणी जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी जर सूचना तुम्हाला दिल्या जातील त्या सर्व सूचनांचा तुम्ही पालन करा. तसेच जर तुम्हाला उद्या गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. ज्या संरक्षण खात्याकडून सूचना येतील किंवा ज्या पोलिसांकडून तुम्हाला सूचना येतील त्या सर्व सूचनांवरती तुम्ही विश्वास ठेवावा. तर या मॉकड्रिलच्या काळात तुम्ही जर मॉल, थिएटर किंवा इतरही कुठल्या ठिकाणी अडकले असाल तर अशी तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी.






