ऐन गणेशोत्सव काळात पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आंदेकर-कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारी जगताशी कसलाही संबंध नसणाऱ्या महाविद्यालयीन तरुण आयुषची हत्या करण्यात आली. माझ्या मुलाची हत्या करून म्हणजेच वनराजला संपवून मुलगा नसल्याची वेदना मला दिली, आता तुलाही (जायवाला) मुलगा नसतो त्याचे काय दु:ख असते हे दाखविण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीने आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलीस तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीविरोधात तक्रार दिली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींची नावे आयुषच्या हत्या प्रकरणात आहेत.
advertisement
न्यायालयात आज काय घडले?
आयुषच्या हत्या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नाही. आम्हाला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. पोलिसांवर आमचा कोणताही आरोप नाही. पण संबंध नसताना आम्हाला अटक करण्यात आले आहे, असा बचावात्मक युक्तिवाद बंडू आंदेकरच्या वतीने त्याच्या वकिलाने केला.
आम्ही गेल्या १० तासांपासून अटकेत आहोत. जी पोलीस तक्रार झाली ती अत्यंत चुकीची आहे. कल्याणी माझी मुलगी आहे जिने फिर्याद दिली. जो मयत झाला तो नातू आहे. आमची नावे या प्रकरणात का आली, हे कळायला मार्ग नाही. गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्यादी आहे. मी त्यावेळी सांगितले होते की कल्याणीने त्यावेळी कट रचला होता. तिच्या घरचे यात अटक झाले आहेत. आता आयुषच्या हत्येचा आणि आमचा काय संबंध? तो माझा नातू आहे, मी माझ्या नातवाला का मारेन? मला मारायचेच असते तर माझ्या प्रतिस्पर्ध्याल मारले असते, असे म्हणत वनराज आंदेकरने भावनिक डाव खेळला.
वनराजला माननारे खूप लोक, त्यापैकी कुणीतरी आयुषची हत्या केली असावी
वनराजचे खूप फॉलोअर्स होते, तो अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या फॉलोवर्सपैकी आयुषला कुणी मारले असेल. परंतु आम्ही तर असे करणे शक्य नाही. आम्हाला गोवले गेले, हे नक्की आहे.
माझे संपूर्ण कुटुंब तुरुंगात गेले पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवले आहे, असे बंडू आंदेकर म्हणाला.
दत्ता काळे याने माझे नाव घेतले नाही. आम्हाला खोटे फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतले गेले. आमच्याकडून काय रिकव्हर करायचे आहे. आम्ही राज्यात नव्हतो. आम्ही केरळमध्ये होतो. आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही, असे बंडू आंदेकर म्हणाला.