मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडला. पण, या मेळाव्यात रामदास कदम यांनी २०१३ साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन एक दिवसाआधी झालं होतं, असा दावा करून नव्या वादाला तोंड फोडलं. यााबद्दल पत्रकारांनी ठाकरे गटाची प्रतिक्रिया जाणून घेतली असता चंद्रकांत खैरे यांनी कदम यांना फटकारलं.
'तसं काहीही नाही. रामदास कदम काहीही बोलतो, डॉक्टरांनी तपासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल माहिती दिली होती. रामदास कदम हा फालतू माणूस आहे. काही बोलतो म्हणून काहीही का, तो कसा आहे हे मला सगळं माहिती आहे. माझ्याकडे पालकमंत्री होता . माझ्यापेक्षा वयाने लहान आहे तो' असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी कदमांच्या वक्तव्याचं खंडन केलं.
advertisement
नेमकं काय म्हणाले रामदास कदम?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं, त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती, काढा माहिती. जबाबदारीने बोलतोय. बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज देखील त्यांना विचारा. दोन दिवस बाळासाहेबांची बॉडी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत का ठेवली होती. मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. कुणी तरी सांगितलं, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. तुम्ही आम्हाला काय शिकवतात. शिवसेना आम्ही मोठी केली. जेल आम्ही भोगली आहे.