बंजारा समाजातील मुली दिवाळीच्या संध्याकाळी घराघरात जातात, त्यांच्या हातात पणती घेऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना करतात. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांसाठी त्या एक खास गाणं गायन करतात:
"वर्षे दनेरी कोड दवाळी याडी तोन मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी बापू तोन मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी भिया तोण मेरा..."
या गीताच्या माध्यमातून त्या देवाला प्रार्थना करतात की कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये आणि प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य लाभावे. मुलींच्या हातातल्या पणतीमध्ये धनधान्याचा आशिर्वाद मानला जातो, आणि त्या कुटुंबीयांना स्वतःच्या आशीर्वादात सामील करतात. प्रत्येक कुटुंबीय याबद्दल दान म्हणून काही पैसे देऊन या आशीर्वादाचा मान राखतो.
advertisement
बंजारा समाजात एक विशेष "गोधन पूजा" देखील केली जाते. या पूजेत अविवाहित मुली वेगवेगळ्या वनस्पती, फुले गोळा करून, त्यातून दिवाळीसाठी विशिष्ट पूजेची तयारी करतात. गोधन पूजेचा उद्देश म्हणजे गायीचे शेण आणि त्याचे पर्यावरणातले महत्त्व अधोरेखित करणे. हे शेण धरतीला समृद्ध करते, अशी श्रद्धा आहे, ज्याचा पाया जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी रोवला गेला आहे. बंजारा समाजाच्या मते, शेण आणि गोमाता ही केवळ उपयुक्त नव्हे तर पूजनीय देखील आहे, म्हणूनच या पूजेच्या माध्यमातून गोधनाचे महत्त्व लोकांना समजावले जाते.