नेमकं घडलं काय?
घाटनांदूर येथील अजिंक्य अशोक साळवे यांच्या मित्राचा कुत्रा काही दिवसांपूर्वी हरवला होता. कुत्रा सापडावा यासाठी लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने आरोपी करण भरत चव्हाण याने संपर्क साधत कुत्र्याबाबत माहिती देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या पैशांच्या मागणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला होता.
कोंबड्या का चोरल्या विचारलं? तर कुऱ्हाडीने डोकंच..., बीडच्या ‘त्या’ प्रकरणाबाबत मोठी अपडेट
advertisement
वादाची कुरापत मनात धरून 31 डिसेंबर रोजी सायंकाळी करण चव्हाण, शोहेब कुरेशी आणि ओमकार मोती यांनी अजिंक्य साळवे यांना मेडिकल परिसरात गाठून शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रारंभी झालेल्या या वादानंतर साळवे आपल्या मित्रांसह तेथून निघून गेले होते.
काही अंतरावर असलेल्या महादेव पट्टी परिसरात आरोपींनी पुन्हा त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवले. यावेळी शोहेब कुरेशी याने लोखंडी गजाने जोरदार प्रहार केल्याने वेदांत बावने हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला. इतरांनीही मारहाण करत दहशत माजवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी करण चव्हाण, शोहेब कुरेशी, ओमकार मोती, ऋषिकेश मोती, पंडित मोती, इम्रान शेख आणि अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले पुढील तपास करत असून, आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.






