मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने थेट महिलेला "चल आपण गोराईला फिरायला जाऊ, येते का?" असा प्रश्न त्या व्यक्तीनं विचारला. या वक्तव्यामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. या घटनेनंतर पीडित महिलेने तातडीनं उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, हा कॉल संजय दालमेत नावाच्या 35 वर्षीय तरुणाने पाली इथून केला होता.
advertisement
पीडितेच्या फिर्यादीवरून उत्तन सागरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी संजय दालमेत याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याने, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशाप्रकारे फोन करुण विचारणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
