रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. कामावरून घरी परतत असताना दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून ती थेट डंपरच्या खाली गेली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृताचे नाव विलास बबन पाटील (वय 50, रा. लाप बुद्रुक) असे असून, ते रोजंदारीवर काम करून संसार चालवत होते, अशी माहिती आहे.
अपघात इतका भीषण होता की, डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीचा अक्षरशः चिरडा झाला. पाईपलाईन रस्त्यावर गेले काही महिने मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले. अखेर या खड्ड्यांनी एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला.
advertisement
घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, डंपर चालकाला शोध पोलीस घेत आहेत.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की, प्रशासनाने वेळेत दुरुस्तीचे काम केले असते तर हा अपघात टळू शकला असता. आता तरी प्रशासनाने धडा घेऊन तातडीने रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.