TRENDING:

रात्री घरी जाताना साधला डाव, गाडी अडवून भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला, नगरमधील धक्कादायक घटना!

Last Updated:

Crime in Shrirampur: अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर रात्री उशिरा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी: अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर रात्री उशिरा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी चव्हाण यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत चव्हाण हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. भाजपच्या माजी नगरसेवकावर अशाप्रकारे हल्ला झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
News18
News18
advertisement

ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा श्रीरामपूरच्या छत्रपती शिवाजी रोडवर घडली. दीपक चव्हाण रात्री घरी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञातांनी हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांची गर्दी होती. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा दीपक चव्हाण हे आपल्या मित्राला भेटून घराच्या दिशेनं जात होते. ते रात्री उशिरा छत्रपती शिवाजी रोडवर आले असता, अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला आणि भररस्त्यात मारहाण केली.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही कैद झालं आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रात्री घरी जाताना साधला डाव, गाडी अडवून भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला, नगरमधील धक्कादायक घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल