भाजपचे अनेक नेते, आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस करत आहेत. भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले की, भाजप हा मोठा पक्ष आहे.महाराष्ट्रात देवेंद्रजींना बहुमत दिले आहे. देवेंद्रजींचे नेतृत्व निर्विवाद नेतृत्व मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी महाराष्ट्र पुन्हा उभा राहीला आहे. त्यामुळे घाई करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. आमचे नेते देवेंद्रजी आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही सांगितले आहे की, देवेंद्रजीच मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यामुळे देवेंद्रजीच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे दरेकर यांनी म्हटले.
advertisement
राज्याला फडणवीसांची गरज...
दरेकर यांनी पुढे म्हटले की, आशावाद प्रत्येकाने ठेवाला पाहीजे. पण लोकशाहीत जास्तीत जास्त जागा मिळवतो त्याला महत्व आहे. प्रत्येक पक्षाची आपली भूमिका वेगळी असते. माझ्या मते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारख्या माणसांची गरज आहे. देवेंद्रजींनी पाच वर्ष शाश्वत विकास दाखवला. तीन पक्षांमध्ये समन्वय ठेवणे, प्रशासनावर अंकुश ठेवणे यासाठी देवेंद्रजींची गरज आहे. हेच भाजप कार्यकर्त्यांना हवे आहे, महायुतीलादेखील आणि महाराष्ट्रालाही हेच हवे असल्याचे दरेकर यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून मान दिला ना...
मागच्या वेळी आमच्याकडे अधिक संख्याबळ असताना आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानले. त्यावेळी त्यावेळी देवेंद्रजी म्हणाले नाही की मी उपमुख्यमंत्री कसा होऊ? आता तशी परिस्थिती नाही. आता आमचे 132 अधिक पाठिंबा मिळवून 137 होतात. अजितदादांचे 41 आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री राहीला तर विकासाला जास्त गती मिेळते, असेही दरेकर यांनी सांगितले.
