TRENDING:

Covid Scam : सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या आणखी एका आरोपीला जामीन, कोविड सेंटर घोटाळा प्रकरण

Last Updated:

Covid Scam : कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली होती. आता, जवळपास दोन वर्षानंतर सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या आणखी एका आरोपीला जामीन मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली होती. आता, जवळपास दोन वर्षानंतर सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.
सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या आणखी एका आरोपीला जामीन
सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या आणखी एका आरोपीला जामीन
advertisement

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून भाजप ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांचा धुरळा उडवत एकच खळबळ उडवून दिली होती. यामध्ये ठाकरेंच्या निकटवर्तीयांची चौकशी झाली होती. आता सुजित पाटकरांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.  पाटकर यांना कोर्टाकडे आपला पासपोर्ट जमा करावा लागणार असून इतरही काही अटी जामिनासाठी कोर्टाने ठेवल्या आहेत.

advertisement

जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व व्यावसायिक सुजित पाटकर यांना अखेर दोन लाखांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात मोठा आरोप करत 36 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

advertisement

ईडीने यापूर्वीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.ईडीच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनीही तपासाला गती दिली होती. कोरोना काळात मुंबई महापालिकेने जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. हे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल केली होती. त्याशिवाय,  रुग्णसंख्येतही फेरफार केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Covid Scam : सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या आणखी एका आरोपीला जामीन, कोविड सेंटर घोटाळा प्रकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल