TRENDING:

BMC Elections : मुंबईत भाजप 150 जागांवर आग्रही, शिंदे गटाची किती जागांची मागणी? जागा वाटपावर समोर आली अपडेट

Last Updated:

BMC Elections : मुंबईत भाजप 150 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. तर, शिंदे गटानेही जागा वाटपात नमतं घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईत भाजप 150 जागांवर आग्रही, शिंदे गटाची किती जागांची मागणी? जागा वाटपावर समोर आली अपडेट
मुंबईत भाजप 150 जागांवर आग्रही, शिंदे गटाची किती जागांची मागणी? जागा वाटपावर समोर आली अपडेट
advertisement

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत सत्ता काबीज करण्याची रणनीती महायुतीमध्ये आखली जात आहेत. मुंबईत यंदा आपलाच महापौर बसवण्यासाठी भाजपकडूनही मिशन बीएमसीची सुरुवात करण्यात आली आहे. तर, ठाणेच नव्हे तर मुंबईतही आपला दबदबा असल्याचे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. अशातच महायुतीमध्ये मुंबईत जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईत भाजप 150 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. तर, शिंदे गटानेही जागा वाटपात नमतं घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

advertisement

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांसह मनसेच्या सात नगरसेवकांनी केलेल्या प्रवेशामुळे एकूण 91 जागांवर हक्क असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. या जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपाला न सोडण्याचा ठाम पवित्रा सेनेकडून घेतला गेला आहे. याशिवाय आणखी 20 ते 25 जागांसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

भाजपकडून 150 जागांची तयारी...

दुसऱ्या बाजूला, भाजपाने 227 पैकी तब्बल 150 वॉर्डमध्ये आपले उमेदवार उतरवण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपाचाच महापौर बसणार, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सेनेच्या बालेकिल्ल्यांवर आग्रही भूमिका घेतली आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान व माजी आमदारांसोबत माजी नगरसेवकांना पुन्हा सक्रिय करून शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

advertisement

महायुतीत जागा वाटपाचा तिढा...

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागा द्याव्या लागणार असल्याने समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. भाजप 150 जागांवर लढण्यावर ठाम असल्यास उरलेल्या 77 जागांपैकी राष्ट्रवादीला 20 जागा दिल्या, तर शिवसेनेच्या वाट्याला फक्त 57 जागा येतील. एवढ्या मर्यादित जागांवर लढण्यास शिवसेना तयार नाही. शिवसेना शिंदे गटाने किमान 100 जागांवर दावा ठोकला आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईत जवळपास 100 हून अधिक नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत. त्यापैकी 45 नगरसेवक हे मागील निवडणुकीत ठाकरेंकडून निवडून आलेले आहेत. शिंदे गटाला जर 100 जागा दिल्यास भाजपच्या वाटेला कमी जागा येतील. यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची समीकरणे गुंतागुंतीची झाल्याची चर्चा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Elections : मुंबईत भाजप 150 जागांवर आग्रही, शिंदे गटाची किती जागांची मागणी? जागा वाटपावर समोर आली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल